अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी १७६९ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक, जाणून घ्या भाजीपाल्यांचे दर

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 25, 2025

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रविवारी १७६९ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली होती. यावेळी बटाट्याची सर्वाधिक ४९८ क्विंटल आवक झाली होती.

बटाट्याला प्रतिक्विंटल १ हजार ते २ हजारांपर्यंत भाव मिळाला. दरम्यान, टोमॅटोची ३८९ क्विंटल आवक झाली होती. टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी पालेभाजांच्या १९ हजार २१५ जुड्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणल्या होत्या. यात मेथीच्या ३ हजार ७५० जुड्यांची आवक झाली होती. मेथी जुडीला १० ते २० रुपये भाव मिळाला.

कोथिंबिरीच्या ११ हजार ३६५ जुड्यांची आवक झाली होती. कोथिंबिरीच्या जुडीला २ ते ५ रुपये भाव मिळाला. पालकच्या ३५० जुड्यांची आवक झाली होती. पालकला ४ ते ६ रुपये भाव मिळाला. करडी भाजीच्या १०० जुडघांची आवक झाली होती. करडीच्या जुडीला ५ ते ७ रुपये भाव मिळाला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा