अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत २२५३ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक, गवारीला प्रतिक्विंटल १२ हजारापर्यंत उच्चांकी दर

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 26, 2025

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी २२५३ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली होती. यावेळी बटाट्याची सर्वाधिक ४८९ क्विंटल आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल १ हजार ते १७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. दरम्यान, टोमॅटोची ४०२ क्विंटल आवक झाली होती. टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते २४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी पालेभाजांच्या १५ हजार ८०२ जुड्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणल्या होत्या.

यात मेथीच्या २८७२ जुड्यांची आवक झाली होती. मेथी जुडीला १५ ते २३ रुपये भाव मिळाला. कोथिंबिरीच्या १० हजार ४८ जुड्यांची आवक झाली होती. कोथिंबिरीच्या जुडीला ३ ते ८ रुपये भाव मिळाला. पालकच्या ७१० जुड्यांची आवक झाली होती. पालकला ७ ते १० रुपये भाव मिळाला. शेपूच्या १३४० जुड्यांची आवक झाली होती. यावेळी शेपू जुडीला ४ ते ६ रुपये भाव मिळाला. वांग्याची ४२ क्विंटल आवक झाली होती.

वांग्यांना प्रतिक्विंटल ५०० ते ३ हजार रुपये भाव मिळाला. फ्लावरची ८३ क्विंटल आवक झाली. फ्लावरला प्रतिक्विंटल ५०० ते ३५०० रुपये भाव मिळाला. गवारीची २६ क्विंटल आवक झाली होती. गवारीला प्रतिक्विंटल २ हजार ते १२ हजार रुपये भाव मिळाला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा