अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी विविध फळांची ५३५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांसह सफरचंदाला प्रतिक्विंटल १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईला ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
सफरचंदांचे भाव आवाक्यात आले असून सफरचंदाला १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची ६४ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल २ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ५० क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी मोसंबीला १५०० ते ५५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
पपईची ११ क्विंटलवर आवक झाली होती. पपईला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्याची ४३ क्विंटलवर आवक झाली होती. संत्र्याला १००० ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदाची १५ क्विंटलवर आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल ७ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
अननसाची ३ क्विंटलवर आवक झाली होती. अननसाला २००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पेरूची ३०८ क्विंटल आवक झाली होती. पेरूला प्रतिक्विंटल ५०० ते २५०० रुपये भाव मिळाला. केळीची १० क्विंटल आवक झाली होती. केळीला १५०० ते २२०० रुपये भाव मिळाला. पिअरची १ क्विंटलवर आवक झाली होती. पिअरला प्रतिक्विंटल ८ हजार ते १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.













