अहिल्यानगर : कापूरवाडी (ता. जि. अहिल्यानगर) येथे एकाने महिलेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ही घटना ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मनोज अशोक साळवे (रा. कापूरवाडी, ता.जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, वरील आरोपीने ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी कापरवाडी येथे हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
त्यानंतर पीडित महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने महिलेच्या डोक्यात पॉस्टिकची बादली मारून जखमी केले. गुन्ह्याचा पोलीस अंमलदार आर. एफ. मोरे करीत आहेत.








