अहिल्यानगर- शहरातील गंजबाजार रमजान पॉलिश अँड कारागीर या दुकानातून तब्बल ४ लाख ८० हजार रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कामगारच पसार झाला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अरमान अली शेख (रा. कोमलासागर, हुगली, पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत रमजान सलाम पीयादा (वय ३७, रा. धरती चौक, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले की, गंजबाजार भागात रमजान पॉलिश अँड कारागीर नावाचे सोने पॉलिशिंगचे दुकान आहे. गेल्या महिनाभरापासून शेख अरमान अली (रा. कोमलासागर, हुगली, पश्चम बंगाल) याला कारागीर म्हणून कामावर घेतले होते.
अरमान हा दुकानाजवळच भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा बाहेर गेलो. अवघ्या १५ मिनिटांत परतल्यानंतर दुकानाचा दरवाजा उघडा, सोन्याचे दागिने ठेवलेला ड्रॉवर रिकामा आणि अरमान गायब असल्याचे दिसून आले. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्याने दुकानातील सुमारे ४ लाख ८० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.








