Ahilyanagar Market : अहिल्यानगरमध्ये कांदा पोहोचला दोन हजारांवर ! गुलछडीच्या फुलांना १८ हजार

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 17, 2025

Ahilyanagar Market : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये शनिवारी ४५ हजार ५७८ क्विंटल गावरान लाल कांद्याची आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये भाव मिळाला. दरम्यान, मागील आठ दिवसांपासून कांद्याच्या भावात तेजी आल्याचे दिसून येत आहे. आठवडभरापूर्वी कांद्याच्या दरात सुमारे ४०० ते ५०० रुपयांनी घसरण झाली होती. परंतु चार दिवसांत कांद्याच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती उपबजारात शनिवारी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला ११०० ते १५०० रुपये, तीन नंबर कांद्याला ६०० ते ११०० रुपये, तर चार नंबर कांद्याला ३०० ते ६०० रुपये बाजारभाव मिळाला. दरम्यान, ६० गोण्यांच्या कांद्याला लॉटला अपवादात्मक भाव म्हणून २२०० रुपयांचा भाव मिळाला, तर १२७ गावरान कांद्याच्या गोण्यांना उच्च प्रतिचा प्रतिक्विंटल २१०० रुपयांचा भाव मिळाला. कांद्याच्या भावात वाढ झाल्यामुळे आवकही वाढल्याचे दिसून आले आहे.

गुलछडीच्या फुलांना १८ हजार रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल मार्केटमध्ये शनिवारी गुलाबाच्या फुलांच्या १८२२ जुड्यांची आवक झाली होती. यावेळी गुलाबाच्या जुडीला १० ते ३० रुपयांपर्यंत भाव मिळाला. झेंडुच्या फुलांची २४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी लिलाक पद्धतीने झालेल्या खरेदीत झेंडुच्या फुलांना प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये भाव मिळाला. गुलछडीच्या फुलांची ९ क्विंटल आवक झाली होती.

गुलछडीला प्रतिक्विंटल १४ हजार ते १८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवंतीच्या फुलांची ८ क्विंटल आवक झाली होती. शेवंतीला १२ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अस्टरच्या फुलांची १ क्विंटल आवक झाली होती. यावेळी अस्टरला प्रतिक्विंटल १२ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. यावेळी डच गुलाबाच्या १३७ जुड्यांची आवक झाली होती. डच गुलाबाच्या जुडीला ४० ते ८० रुपये भाव मिळाला.

१७५१ क्विंटल भाजीपाल्याची आवक

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी विविध भाजीपाल्याची १७५१ क्विंटल आवक झाली होती. य्यावेळी मेथी वगळता शेपू व कोथिंबीरीच्या जुडीला २ ते ९ रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत टोमॅटोची २८१ क्विंटल आवक झाली होती.

यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ४०० ते २७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. बटाट्याची ५२८ क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. वांग्याची ३५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना ३०० ते २००० रुपये भाव मिळाला.

बाजार समितीत काकडीची ९८ क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल २०० ते १२०० रुपये भाव मिळाला. गवारीची १८ क्विंटल आवक झाली होती. गवारीला २००० ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लावरची ३३ क्वंटल आवक झाली होती. फ्लावरला ३०० ते ३००० रुपये भाव मिळाला.

घोसाळ्याची ९ क्विंटल आवक झाली होती. घोसाळ्याला प्रतिक्विंटल ६०० ते ३००० रुपये भाव मिळाला. दोडक्याची ३० क्विंटल आवक झाली होती. दोडक्याला ५०० ते २५०० रुपये भाव मिळाला. कारल्याची २३ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल १००० ते ३५०० रुपये भाव मिळाला. भेंडीची २१ क्विंटलवर आवक झाली होती.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा