Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात मंदिराजवळ गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 23, 2025

Ahilyanagar News : अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई गावातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे गावातील मंदिराजवळील झाडाला गळफास घेऊन ४० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचे उघड झाले.

मृत व्यक्तीचे नाव गणेश दादाराव कोतकर (रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे.

ह्याबाबत सविस्तर माहिती अशी की, सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गावातील मंदिराजवळ कोतकर हे झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

त्यांचे नातेवाईक नवनाथ रावसाहेब उतके (रा. म्हसोबा परखेड, ता. गंगापूर, सध्या रा. जेऊर बायजाबाई) यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. खराडे यांनी तपासणी करून कोतकर यांचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे स्पष्ट केले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा