Ahilyanagar News : ..आस विठ्ठलाच्या दर्शनाची ! अहिल्यानगरमधील नव्वद वर्षांच्या आसराबाई पायी निघाल्या पंढरीला

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: June 27, 2025

सोनाई : शनेश्वर देवस्थानच्या वतीने शनिशिंगणापूर येथून पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनासाठी शिंगणापूर ते पंढरपूर पायी दिंडी दरवर्षी निघत असते. या दिंडीमध्ये हनुमान वाडी येथील 90 वर्षीय आसराबाई कुटे या पायी दिंडीने विठ्ठलाच्या भेटीला निघाल्या आहे. शुक्रवारी (दि.२६) ही दिंडी रुईछत्तीसी येथे मुक्कामी होती. ही दिंडी घोगरगाव येथे पोहोचली असता या दिंडीला भेट देण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील गडाख यांनी भेट दिली.

यावेळी शनिशिंगणापूर देवस्थानच्या वतीने विश्वस्त पोपटराव शेटे यांनी स्वागत करून त्यांचा सन्मान केला. यावेळी दिंडीमध्ये हनुमान वाडी येथील 90 वर्षे वयाच्या आसराबाई कुटे या सहभागी झाल्या आहेत. डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठलाच्या भेटीला पायी निघाल्या आहेत. आसराबाई कुटे यांना देवधर्माची आवड असल्याने त्या कायमच धार्मिक कार्यक्रमात भाग घेत असतात.

तसेच कुटे कुटुंब हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. मोल मजुरीच्या निमित्ताने ते 1972 साली ते सोनई लगत असलेल्या हनुमान वाडी भागात आले. मोलमजुरी करत असताना ते येथेच स्थायिक झाले. विठ्ठलाच्या भेटीसाठी 90 वर्ष वय झाले असले तरी विठ्ठल भेटीसाठी त्या निघाल्या आहेत. त्यांचे सर्वानाच कौतुक लागत असून आसराबाई कुटे यांचा देवस्थानचे माजी विश्वस्त आदिनाथ शेटे यांनी साडी चोळी देत जेष्ठ नेते विश्वास गडाख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा