Ahilyanagar News : अहिल्यानगरकरांनो जेवणाआधी सावधान ! ‘या’ हॉटेलमध्ये शिजतय गोमांस, गुन्हा दाखल

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: June 17, 2025

अहिल्यानगरकरांनो जेवणाआधी सावधान ! असं म्हणण्याची वेळ आलीये. त्याच कारण असं की, अहिल्यानगरमधील काही हॉटेलमध्ये गोमांस शिजत असल्याचे समोर आले आहे. राहुरी तालुक्यातील गुहा येथे नगर-मनमाड मार्गावर असलेल्या दोन हॉटेलमध्ये गोवंशिय जातीचे शिजलेले मांस मिळून आले आहे. हा धक्कादायक प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६ हजार ७५० रुपयांचे ४५ किलो गोवंश जातीचे मांस जप्त करून हॉटेल मालका विरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यात नगर मनमाड जाणारे रोडच्या कडेला गुहा शिवारातील हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवात येथे मास विक्री करण्यात येत असल्याचा डायल ११२ वर कॉल आला असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

गुहा गावच्या शिवारातील हॉटेल मेवात व हॉटेल राणी मेवात येथे एक इसम एका पातेल्यातून शिजलेले मांस बाहेर काढीत असताना दिसून आला. त्यास नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मोहम्मद अली मोहम्मद सहून असे असल्याचे सांगीतले. यावेळी पोलीसांनी त्यास पातेल्यात काय आहे असे विचारले असता त्याने सदर पातेल्यात गोवंशिय जातीचे मांस असल्याचे सांगितले.

यावेळी पोलिसांनी दोन्ही कारवाईत ६ हजार ६५० रुपये किंमतीचे ४५ किलो गोवंश जातीच्या जनावरांचे गोमांस करून जप्त करत त्यातील काही मांस केमिकल तपासणी करिता राखीव ठेवून उर्वरित मांस जागीच नष्ट केले आहे.

याबाबत पोलीस नाईक प्रवीण बागुल यांच्या फिर्यादीवरून हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवातचा मालक मोहम्मद अली मोहम्मद सहुन याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शक सुरू आहे. कोल्हार, गुहा व परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या कार्यकर्त्यांचे हिंदू समाज बांधवांनी कौतुक केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा