जर तुम्ही आठवड्याच्या शेवटी काही दमदार, थरारक आणि भावनांनी भरलेली वेब मालिका किंवा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर हॉटस्टारवरील ट्रेंडिंग यादी तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. भारतात सध्या जिओ हॉटस्टारवर जे टॉप 10 शो आणि चित्रपट ट्रेंड करत आहेत, त्यात थरार, भावनात्मक गुंतवणूक, रहस्य आणि एकापेक्षा एक दमदार अभिनयाची मेजवानी अनुभवता येईल. यामध्ये अभिनेता अक्षय कुमारचा एक दमदार चित्रपटही आहे, ज्याने चाहत्यांचे मन जिंकले आहे.
‘क्रिमिनल जस्टिस’

हॉटस्टारवर सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘क्रिमिनल जस्टिस’. या मालिकेचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. गुन्हा, न्यायव्यवस्था आणि सायकोलॉजिकल गुंतागुंत यांचं जबरदस्त मिश्रण असलेल्या या सीझनचं IMDb रेटिंग 8.1 आहे, जे याच्या दर्जाचा प्रत्यय देतं.
‘लाफ्टर शेफ्स’

दुसऱ्या क्रमांकावर आहे ‘लाफ्टर शेफ्स’ हा एक हटके रिअॅलिटी शो. अन्न आणि हास्य यांचं अनोखं मिश्रण असलेल्या या शोमध्ये स्पर्धक जेवढं स्वयंपाक करत असतात, तेवढंच ते प्रेक्षकांना हसवतातही. IMDb वर या शोला 8.7 रेटिंग मिळालं आहे.
‘मिस्ट्री’

‘मिस्ट्री’ नावाची वेब सिरीज तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये तुम्हाला रहस्य, गूढता आणि मनाला हादरवून टाकणारी कथा पाहायला मिळते. IMDb रेटिंग थोडं कमी असलं (6.2), तरी तिच्या कथानकामुळे ती प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवते आहे.
‘आयर्न हार्ट हिंदी’

चौथ्या क्रमांकावर आहे ‘आयर्न हार्ट हिंदी’. या मालिकेचं IMDb रेटिंग 4.1 असूनही काही प्रेक्षकांना ती शैली आवडते आहे.सध्या ही मालिका देखील हॉटस्टारवर ट्रेंडिंगवर दिसून येतेय.
‘केसरी चॅप्टर 2’

या यादीत खास लक्ष वेधून घेतो तो अक्षय कुमारचा ‘केसरी चॅप्टर 2’. युद्धभूमीवर घडणारी ही कथा, त्यातील शौर्य आणि भावनिक गाठ प्रेक्षकांच्या मनाला भिडते. IMDb रेटिंग 8 असलेल्या या चित्रपटात अक्षयची कामगिरी नेहमीप्रमाणेच तितकीच दमदार आहे.
‘गेम ऑफ थ्रोन्स’

जगप्रसिद्ध ‘गेम ऑफ थ्रोन्स’ अजूनही लोकप्रियतेत कमी नाही. सहाव्या स्थानावर असलेल्या या मालिकेचं IMDb रेटिंग 9.2 असून, ज्यांनी ही मालिका अजून पाहिलेली नाही, त्यांच्यासाठी ती एक खास पर्वणी आहे.
‘आर्य’

‘आर्य’ ही मालिका सातव्या स्थानावर असून ती एक स्त्री-प्रधान थ्रिलर ड्रामा आहे. सुष्मिता सेनच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पडली असून IMDb वर तिला 7.7 रेटिंग मिळालं आहे.
‘दयान’

‘दयान’ या रहस्यकथेने भरलेल्या मालिकेने आठवे स्थान पटकावलं आहे. गूढ कथा आणि तगडी स्क्रिप्टमुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’

नवव्या क्रमांकावर ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ हा एक प्रेरणादायक चित्रपट आहे, जो एका युवकाच्या जगभरातील प्रवासाची कथा सांगतो. IMDb रेटिंग 6.8 असलेल्या या चित्रपटात हलकंफुलकं मनोरंजन आणि विचारप्रवृत्त करणारे क्षण दोन्ही आहेत.
‘स्पेशल ऑप्स’

या यादीचा शेवट ‘स्पेशल ऑप्स’ या अॅक्शन-थ्रिलर मालिकेने केला आहे. गुप्तहेरांच्या मिशनवर आधारित ही मालिका सध्या दहाव्या स्थानावर असून IMDb रेटिंग 8.6 आहे. तगडं लेखन, उत्कृष्ट अॅक्शन आणि दमदार अभिनय यामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.








