गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या मार्केट यार्डात विविध फळांची ५९५ क्विंटल आवक, डाळिंबाला १५ हजार रुपयांपर्यंत भाव

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 26, 2025

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विविध फळांची ५९५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. तर मोसंबीला ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदांचे भाव आवाक्यात आले असून सफरचंदाला १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची ३९ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ५७ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी मोसंबीला १५०० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईची ३५ क्विंटलवर आवक झाली होती.

पपईला प्रतिक्विंटल १००० ते ३५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्याची १२९ क्विंटलवर आवक झाली होती. संत्र्याला १००० ते ६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदाची १४ क्विंटलवर आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल ७ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला, अननसाची ४ क्विंटलवर आवक झाली होती. अननसाला २००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

पेरूची २६० क्विंटल आवक झाली होती. पेरूला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. केळीची १६ क्विंटल आवक झाली होती. केळीला १५०० ते २००० रुपये भाव मिळाला. चिकूची २ क्विंटल आवक झाली होती. चिकूला प्रतिक्विंटल २ हजार ते ५ हजारांपर्यंत भाव मिळाला. कलिंगडाची ७ क्विंटल आवक झाली होती. कलिंगडाला १००० ते १२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

ड्रॅगन फ्रूटला ११ हजार रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर बाजार समितीत सोमवारी ड्रॅगन फ्रूटची २४ क्विंटलवर आवक झाली होती. ड्रॅगन फ्रूटला ३ हजार ते ११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सीताफळाची २ क्विंटलवर आवक झाली होती. सीताफळला प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते ६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा