अहिल्यानगर- शिविगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तिघांनी दुचाकीस्वारावर कोयता, लाकडी दांडके, लोखंडी रॉडने हल्ला केला. ही घटना २३ ऑगस्ट रोजी घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकनाथ सोनवणे व त्याच्या दोन मुलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत जखमी दत्ता बबन वाघचौरे (रा. सावेडी गाव अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
फिर्यादीत म्हटले की, २३ ऑगस्ट रोजी बालिकाश्रम रोड ते जुना बोल्हेगाव रस्त्याने जात असताना एकनाथ सोनवणे व त्याची मुले शिवीगाळ करीत होते.
शिवीगाळ का करता, असे विचारले असता त्यांनी कोयता व लोखंडी रॉडने माझ्यावर हल्ला केला. डोक्यात, हात व पायावर वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल झाला आहे.








