अहिल्यानगर- शहरातील बोरुडे मळा परिसरातील रेड प्लेम कॅफे समोर एकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला जबर मारहाण करण्यात आली. ही घटना १८ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता घडली.
याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे घरी असताना त्यांना बहिणीचा फोन आल्याने ते मित्रांबरोबर बोरूडे मळ्यातील रेड प्लेम कॅफे येथे गेले.
त्यावेळी फिर्यादीने माझ्या बहिणीला का त्रास देता असे विचारले. त्याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ धमकी देत काहीतरी धारदार शस्त्राने हल्ला केला.
हॉस्पिटलमध्ये दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड गुन्ह्याचा तपास करीत आहेत.








