दिवसाच्या धावपळीत आपण कित्येकदा स्वतःकडे लक्ष द्यायलाच विसरतो, विशेषतः केसांबाबत. केस गळणे, वाढ न होणे, कोरडेपणा या सगळ्या समस्या इतक्या सामान्य झाल्या आहेत की आपण त्यांना नियती मानून स्वीकारतो. पण यावर आपल्या स्वयंपाकघरातच एक जबरदस्त उपाय लपलेला आहे. आज आपण अशाच एका घरगुती पण प्रभावी उपायाबाबत जाणून घेणार आहोत, जी तुमचे केस चार पट वेगाने वाढवू शकते.
तांदळाचे पाणी ठरेल वरदान
सध्या प्रदूषण, ताणतणाव, असंतुलित आहार आणि झोपेच्या चुकीच्या सवयीमुळे केसांचं आरोग्य बिघडत चाललं आहे. केवळ गळतीच नाही, तर केस वाढणंही थांबतंय. बाजारात असंख्य उत्पादनं मिळतात, जाहिरातींचे गोंधळ चालूच असतात, पण त्यांचा परिणाम कायमचा होतोच असं नाही.
यासाठी एक सोप्पा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे तांदळाचं पाणी. होय, अगदी आपल्या घरात असणारं साधे पांढरे तांदूळ हे तुमच्या केसांसाठी वरदान ठरू शकते. तज्ञ देखील सांगतात की तांदळात असलेले अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि अॅमिनो अॅसिड्स केसांच्या मुळांना पोषण देतात आणि त्यांची वाढ गतीने होते.
‘असा’ तयार करा स्प्रे
तांदळाचं हे औषधी पाणी तयार करायला फार मेहनत लागत नाही. 100 ग्रॅम तांदूळ अर्धा लिटर पाण्यात सुमारे 3 तास भिजवून ठेवा. त्यानंतर हे मिश्रण मंद आचेवर 10-15 मिनिटे गरम करा. एकदा ते थंड झालं की पाणी गाळा. आता या पाण्यात थोडंसं ग्लिसरीन आणि थोडा कडुलिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून ठेवा.
झोपण्यापूर्वी हे मिश्रण केसांच्या मुळाशी शिंपडा आणि सौम्य मालिश करा. एक रात्रभर हे केसांवर राहू द्या आणि सकाळी सौम्य शाम्पूने धुवा. नियमितपणे हे केल्यास केवळ केस गळती थांबेल असं नाही, तर केस मजबूत, लांब आणि चमकदार होऊ लागतील. विशेषतः ज्या महिलांना किंवा तरुणांना नैसर्गिक उपायांची गरज आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.








