अहिल्यानगर- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वत्र तिरंगा रॅली उत्साहात होत आहे. पूर्वी भारत देश हा जगात दहाव्या नंबरला होता. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीमध्ये भारत देश जगात पाचव्या नंबरला आला आहे. नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करून देशाला आत्मनिर्भर बनवावे. देश आत्मनिर्भर झाल्यास विश्वगुरू होईल, असे प्रतिपादन विधानसभेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.
सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या सावेडी मंडलातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य सुनील रामदासी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सावेडी मंडलाचे अध्यक्ष सीए ज्ञानेश्वर काळे, प्रा. मकरंद खेर, महिला अध्यक्ष प्रिया जानवे, सावेडी महिला मोर्चा अध्यक्षा रेणुका करंदीकर, नगरसेवक रामदास आंधळे, महेश तवले, संपत नलावडे, नरेंद्र कुलकर्णी, अनिरुद्ध घैसास, नितीन शेलार, बाळासाहेब गायकवाड, मुकुल गंधे, साहिल शेख, अजिंक्य गुरावे, आकाश सोनवणे, रुद्रेश अंबाडे, हेमंत पवार, सुजित खरमाळे, पुष्कर कुलकर्णी, करण कराळे, ज्ञानेश्वर काळे, सुमित बटुळे, बंटी डापसे, श्रीचंद सचदेव, शशांक कुलकर्णी, छाया रजपूत, सविता कोटा, अर्चना बनकर, वंदना पंडित, शारदा होशिंग आदी उपस्थित होते.
अनिल मोहिते म्हणाले, तिरंग्याचा प्रति कृतज्ञता भाव प्रकट करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तिरंगा झेंड्याचा सन्मान हा प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय आहे. सावेडी परिसरात तिरंगा रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
ज्ञानेश्वर काळे म्हणाले, विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार सावेडी परिसरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी पाऊस असूनही या तिरंगा रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.








