अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल मार्केटमध्ये गणोशोत्सवामुळे फुलांच्या बाजारात तेजी दिसून आली. यावेळी सर्वच फुलांच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले. गुलाबाच्या फुलांच्या २४२६ जुड्यांची आवक झाली होती.
यावेळी गुलाब फुलांच्या जुडीला ५० ते ८० रुपयांपर्यंत भाव मिळाला. झेंडुच्या फुलांची ६६ क्विंटल आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत झेंडुच्या फुलांना प्रतिक्विंटल ६००० ते १० हजार रुपये भाव मिळाला. गुलछडीच्या फुलांची १४ क्विंटलवर आवक झाली होती. गुलछडीला प्रतिक्विंटल १५ हजार ते २२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेवंतीच्या फुलांची २२ क्विंटल आवक झाली होती. शेवंतीला १५ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आस्टरच्या फुलांची १७ क्विंटल आवक झाली होती. यावेळी आस्टरला प्रतिक्विंटल १५ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. जरबेराच्या फुलांची २ क्विंटल आवक झाली होती. जरबरेला प्रतिकिलो ६ हजार ते १० हजार रुपये भाव मिळाला. यावेळी डच गुलाबाच्या २६७ जुड्यांची आवक झाली होती. डच गुलाबाच्या जुडीला १०० ते १५० रुपयांपर्यंत भाव मिळाला.








