शेतकरी व नगरकरांसाठी खा. लंके यांची प्रार्थना ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात खा. नीलेश लंके यांची आरती

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: September 2, 2025

नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर, माळीवाडा येथे मंगळवारी खासदार नीलेश लंके यांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. या वेळी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. भक्तीभाव, उत्साह आणि अभिमानाने गजबजलेल्या वातावरणात खासदार लंके यांनी शेतकरी बांधवांसह नगरकर नागरिकांच्या आरोग्य, समृद्धी, सुख-शांती व कल्याणासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.

 खासदार लंके यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा, भक्ती आणि समाजातील ऐक्य यांचा संदेश दिला. त्यांनी सर्व नगरकरांना हार्दिक शुभेच्छा देत म्हटले, “गणेशोत्सव हा आनंद, ऐक्य व संस्कृती यांचा उत्सव आहे. नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती यांच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांना भरघोस पीक येवो, नागरिकांचे आरोग्य उत्तम राहो आणि नगर जिल्हा सुख-समृद्धीत बहरो, हीच माझी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे.”

 या प्रसंगी अभय आगरकर, भगवान फुलसौंदर, दत्ता कावरे, विक्रम राठोड, योगिराज गाडे, दत्ता जाधव, प्रदीप परदेशी, परेश लोखंडे, संजय गरुडकर, संगमनाथ महाराज, अशोकराव कनाडे, अशोकराव बब्बर, दिलदारसिंग बीर, ओम काळे, अल्ताफ शेख, गणेश कुलट, शरद पवार, संजय जाधव, गोरक्ष पाडोळे, पंडितराव खरपुडे, नितीन पुंड, रोशन गांधी, संतोष गांधी, प्रवीण वारुळे, सचिन कराळे, सचिन गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा