छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेवून राज्यात महायुती सरकार काम करीत आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व निर्णय प्रक्रीयेत लोककल्याणकारी राज्याचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पिंपळवाडी येथे ग्रामस्थांच्या पुढाकारने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवस्मारक उभारण्याचा निर्णय पालकमंत्री झाल्यानंतर केला असून,हे शिवस्मारकच सर्व समाजला प्रेरणादायी ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वाचे दैवत आहे.अठरा पगड जाती जमातींना बरोबर घेवून हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली.
आज ज्या पध्दतीने धर्म आणि जातीवर मतभेद निर्माण करण्माचे प्रयत्न होतात त्याला महाराजांच्या विचाराने पुढे जाणे हेच उतर असल्याचे त्यांनी केले.
महायुती सरकारने राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले.राज्यातील १२किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झालेला समावेश राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला नौदलाच्या ध्वजावर दिलेले स्थान महाराजांचा गौरव ठरला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
केंद्र आणि राज्य ससरकारच्या सर्व निर्णय प्रक्रीयेत महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब पाहायला मिळते.रयतेचे राज्य ही संकल्पना मांडली.महायुती सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्याचा विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिर्डी मतदार संघात विकासाची प्रक्रीया पुढे घेवून जाताना तरूणांसाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले आहे.शिर्डीच्या औद्योगिक वसाहती मध्ये उद्योग येत असून यासाठी लागाणारे प्रशिक्षण तरूणांना देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून गोदावरी कालव्याच्या कामासाठी ४००कोटी रुपये मंजूर केले आहेत.कालव्याच्या कामा बरोबरच चार्या दुरूरस्तीसाठी निधी देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.








