रतीय रेल्वेने नुकताच एक असा निर्णय घेतला आहे ज्याने अनेक प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आपण सगळ्यांनी ऐकलंय की ट्रेनमध्ये प्रवास करताना ज्वलनशील वस्तू बरोबर नेण्यास मनाई असते. पण आता या यादीत एक फळही सामील झालं आहे, ज्याला बहुतेक लोक देवपूजेसाठी, यात्रेसाठी किंवा घरगुती वापरासाठी बरोबर नेतात. मात्र रेल्वेने स्पष्टपणे सांगितलं आहे की आता तुम्ही ‘सुका नारळ’ बरोबर घेऊन प्रवास करू शकणार नाही.

सुका नारळ

हे ऐकून अनेकांना धक्का बसेल, कारण सुक्या नारळाला आपल्या संस्कृतीत फार मोठं धार्मिक आणि भावनिक स्थान असलेलं फळ आहे. कोणतेही शुभकार्य असो किंवा देवदर्शनाची यात्रा, सुका नारळ जवळ बाळगणं हे आपल्या सवयीचा भाग आहे.

पण रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे की या सुक्या नारळाच्या बाहेरील खरड्या भागाला सहज आग लागू शकते आणि त्यामुळे तो ज्वलनशील वस्तूंच्या श्रेणीत येतो. ही बाब लक्षात घेता प्रवासादरम्यान सुका नारळ सापडल्यास प्रवाशावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
रेल्वेकडून यादी जाहीर

रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपासून सर्व स्टेशनांवर, प्लॅटफॉर्मवर, तपासणी केंद्रांवर एकच सूचना लावली आहे, प्रवासाच्या सामानात जर कोणतीही ज्वलनशील वस्तू सापडली, तर संबंधित प्रवाशावर कारवाई केली जाईल.

यात गॅस सिलेंडर, पेटवायच्या वस्तू, धारदार हत्यारे यासोबत आता सुक्या नारळाचा देखील समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामागचं कारण म्हणजे प्रवाशांची सुरक्षितता. एक छोटीशी असावधता कधीही मोठ्या अपघाताचं कारण ठरू शकते, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सामान्य माणसाला आपल्या धार्मिक भावना, सांस्कृतिक परंपरा जपताना जरा अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः प्रवास करताना. सध्या रेल्वेच्या या नवीन निर्णयाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.








