अहिल्यानगरच्या बाजार समितीत डाळिंबाला मिळाला १७ हजारांचा भाव तर सफरचंदाला १५ हजारापर्यंत भाव

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 30, 2025

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी ६६१ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची ७३ क्विंटल आवक झाली होती.

डाळिंबाला प्रतिक्विंटल १५०० ते १७हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ६९ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १ हजार ते ४ हजार रुपये भाव मिळाला. संत्र्याची १०६ क्विंटल आवक झाली होती. संत्र्याला प्रतिक्विंटल १ हजार ते ६ हजार रुपये भाव मिळाला.

पपईची १९ क्विंटल आवक झाली होती. पपईला १ हजार ते ३५०० रुपये भाव मिळाला. सीताफळाची दोन क्विंटल आवक झाली होती. सीताफळाला २ हजार ते ८ हजार रुपये भाव मिळाला. सफरचंदाची ६७ क्विंटल आवक झाली होती.

सफरचंदाला प्रतिक्विंटल ७ हजार ते १५ हजार रुपये भाव मिळाला. कलिंगडाची ४ क्विंटल आवक झाली होती. कलिंगडाला प्रतिक्विंटल १ हजार रुपये भाव मिळाला. केळीची १६ क्विंटल आवक झाली होती. केळीला प्रतिक्विंटल १५०० ते २ हजार रुपये भाव मिळाला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा