अहिल्यानगर- भिंगार शहरातरील भिंगार हायस्कूलजवळ सकाळी ११ वाजता एकाने शाळकरी मुलीचा पाठलाग करून शाळेच्या प्रवेशद्वारात विनयभंग केला. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यश किसन नन्नवरे (रा. मारूती मंदिराशेजारी, नागरदेवळे, ता. जि. अहिल्यानगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करीत होता.
५ ऑगस्ट रोजी तो पाठलाग करीत शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत आला. तो म्हणाला, तु मल खूप आवडतेस, माझ्याशी मैत्री कर असे बोलून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ गुन्ह्याचा तपास करीत आहेत.








