तुम्ही कधी अशा मुलीला भेटला आहात का, जिला पाहिल्यावर क्षणभर सगळं विसरायला झालं? जिला बघून वाटलं की ही खूप गोड, शांत आणि हसतमुख आहे, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारचं गूढ दडलेलं आहे. जी मैत्रीत जीव ओतते आणि प्रेमात अखेरपर्यंत साथ देऊ शकते. पण जीचं मन दुखावल्यावर तिचं मौनही इतकं अर्थपूर्ण आणि तीव्र असतं, की समोरच्याला ते शब्दांपेक्षा जास्त लागतं. अंकशास्त्रात अशा मुलींचा संबंध क्रमांक 2 शी जोडला जातो, आणि त्या खरंच इतरांपेक्षा काहीशा वेगळ्या असतात.
मूलांक 2 म्हणजे त्या मुली ज्या 2,11,20 किंवा 29 तारखेला जन्म घेतात. त्यांचा अधिपती ग्रह आहे चंद्र आणि म्हणूनच त्यांचा स्वभावही चंद्रासारखाच असतो. सौम्य, शांत, पण भावनांनी परिपूर्ण. या मुली बाहेरून जितक्या कोमल वाटतात, तितक्याच आतून त्या ठाम निर्णय घेणाऱ्या असतात. कुणाला हसवण्यात त्या पटाईत असतात, पण त्यांच्या मनात काय चाललंय, हे फारसं कुणाला समजत नाही.
त्यांचा मूड क्षणात बदलतो. कधी उत्साहात नाचणाऱ्या, तर कधी अचानक विचारात गुंग होणाऱ्या. पण याच मूड स्विंग्स त्यांच्या कलात्मकतेचं गमक असतात. त्या लिहू शकतात, चित्रं काढू शकतात, स्वप्न उभं करू शकतात आणि जेव्हा त्या प्रेमात पडतात, तेव्हा त्या प्रेमात जगतात. पण त्याचबरोबर त्या प्रेमासाठी भांडूही शकतात, अडथळ्यांवर मात करू शकतात आणि गरज पडल्यास सगळ्यांशी युद्धही करू शकतात.
मूलांक 2 चा स्वभाव
या मुलींची मैत्री एकदा मिळाली की, ती आयुष्यभराची असते. त्या आपल्या मित्रांना हसवतात, साथ देतात, समजून घेतात. पण जर कोणी त्यांचा विश्वास तोडला, तर त्या अशा शांततेनं दूर जातात की त्या माणसाला स्वतःचाच राग येतो. त्या बदला घेतात असं नाही म्हणता येणार, पण जेव्हा वेळ येते, तेव्हा त्या शांतपणे उत्तर देतात आणि ते उत्तर एवढं प्रभावी असतं की समोरची व्यक्ती ते विसरत नाही.
अर्थात, यांचा दुसरा पैलूही तितकाच रंगतदार आहे. त्या फक्त भावनांनी चालत नाहीत, तर पैसा, संपत्ती आणि सुरक्षितता यांचाही विचार करतात. त्या विलासी गोष्टींना नक्कीच पसंती देतात, पण त्याचबरोबर शिस्तीने पैसे वाचवतात, गुंतवणूक करतात आणि स्वतःचं भविष्य सुरक्षित करतात. अशा मुली सहज कोट्यवधींच्या मालक होऊ शकतात, फक्त त्यांच्या हुशारीवर विश्वास ठेवून.
चंद्र मजबूत करण्याचे उपाय
या मुली स्वतःला सावरणंही शिकलेल्या असतात. प्रेमात फसवलं गेलं, स्वप्नं चुरगाळली गेली, तरी त्या गोंधळून राहत नाहीत. त्या पुन्हा उठतात, आपली ओळख नव्याने घडवतात आणि अशा आत्मविश्वासानं पुढे जातात की इतरांना प्रेरणा वाटते.
जर तुमच्या आयुष्यात मूलांक 2 ची मुलगी असेल, तर तिचं हृदय कायम जपा. कारण एकदा तिने तुम्हाला आपला मानलं, की ती तुम्हाला आयुष्यभर विसरत नाही. अशा मुलींनी चंद्र मजबूत करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करावं, चांदीची वस्तू धारण करावी आणि “ॐ नमः शिवाय” या मंत्राचा जप करावा. यामुळे त्यांच्या मनातील अस्थिरता कमी होईल आणि त्यांचं स्वाभाविक तेज अजून खुलून येईल.








