शेवगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाच्या अतंर्गत आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव येथे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या तिरंगा यात्रेत प्रशासकिय अधिकारी, माजी सैनिक, विविध संघटना व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. शेवगाव शहरातील रेसिडेन्सील हायस्कूल, बाळासाहेब भारदे हायस्कूल, ज्ञानदीप विद्या मंदिर, आदर्श कन्या विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींचा यांचा बँड पथकासह असलेला सहभाग आकर्षक ठरला.
शेवगाव शहरात तिरंगा यात्रेची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून शनि मारुती मंदिर सभा मंडप या ठिकाणी यात्रेचा समारोप करण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.
यावेळी तहसीलदार आकश – दहाडदे, पोलिस निरीक्षक संतोष – मुटकुळे, मुख्याधिकारी विजया घाडगे, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विनोद शेळके व सहकारी, भिमराज सागडे, भाजप शेवगाव मंडलाध्यक्ष महेश फलके, बोधेगाव मंडलाध्यक्ष संजय टाकळकर, नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, नितीन दहिवाळकर, भाजप शहराध्यक्ष राहुल बंब, बापू धनवडे, सतीशराव लांडे, मच्छिद्र बर्वे, महिला आघाडी अध्यक्षा विद्या अधाट, मंदाकिनी मुरकुटे, महिला शहराध्यक्षा दिपाली काथवटे, रेसिडेन्सील हायस्कूल, बाळासाहेब भारदे हायस्कूल, ज्ञानदीप विद्या मंदिर, आदर्श कन्या विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक आदी उपस्थित होते.








