अहिल्यानगर- जुन्या शाब्दिक वादातून सात जणांच्या टोळक्याने एकास तलवार व रॉडने मारहाण केली. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नसीर शेख अब्दुल्ला उर्फ तुकी, फर्मान शेख नसीर उर्फ लुक्का, अशांन शेख नसीर (सर्व रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर), मुशाहिद शेख लियाकत, अकिल शेख लियाकत, सर्फराज शौकत शेख उर्फ कलेजी, सलमान शेख आसिफ उर्फ दंगल अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत फैजान निसार जहागीरदार (वय २५, रा. वेल. जी. हाईटस्, हनुमान मंदिराशेजारी, अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, वरील आरोपींनी संगणमत करून तु पिंजरा गोश मार्केट येथून का जातो म्हणून रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तलवारीने मारहाण करून खिशातील १५ हजार रुपये काढून घेतले. पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद वाघ गुन्ह्याचा तपास करीत आहेत.














