अहिल्यानगर हादरलं ! दुकानात आले, दुकानदाराच्या मुलीला गोडावून मध्ये नेत अत्याचार केला, त्यानंतर…

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: June 30, 2025

दुकानामध्ये सामान घेण्यासाठी आलेल्या दोघांनी दुकानातील अल्पवयीन मुलीला गोडाऊन मध्ये नेऊन मित्राच्या मदतीने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन जणांविरोधात जामखेड गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांनी या घटनेबाबत सोशल मिडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपीला अटक न झाल्यास प्रशासनाला परवडणार नाही असे देखील म्हटले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील नान्नज येथे दि. २९ जून रोजी १२ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी व तीची आई दुकानात असताना त्या ठिकाणी आरोपी मनोज महादेव हुंबे (वय २५ रा. बोर्ले ता. जामखेड) व त्याच्या सोबत त्याचा एक अल्पवयीन मित्र असे दोघेजण दुकानात आले. अल्पवयीन मुलगा हा अल्पवयीन फिर्यादी मुलगी हिच्या वर्गातीलच आहे.

त्यांना सामान देण्यासाठी पीडिता व आरोपी हे त्यांच्या घराजवळील गोडाऊन मध्ये आले. यावेळी एकाने मुलीचे तोंड दाबले व दोन्ही हात पकडले तर आरोपी मनोज हुंबे याने पिडीत मुलीवर अत्याचार केला व घटनास्थळाहुन आरोपी पळून गेले. यानंतर सदरचा घडलेला प्रकार पिडीत मुलीने आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईवडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली.

याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनोज महादेव हुंबे व त्याचा एक अल्पवयीन मित्र दोघे (रा. बोर्ले ता. जामखेड) या दोघांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मधील अल्पवयीन मुलास अहिल्यानगर येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले असुन दुसरा आरोपी मनोज हुंबे हा अद्याप फरार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा