अहिल्यानगरच्या भाजीपाला बाजारात बटाट्याची सर्वाधिक आवक, मेथीसह कोथिंबिरीच्या जुडीला १२ रुपयांपर्यंत भाव

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 19, 2025

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विविध भाजीपाल्याची २०५४ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४२५ क्विंटल आवक बटाट्याची झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये भाव मिळाला. टोमॅटोची ३१४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांपासून टोमॅटोच्या दरात तेजी कायम आहे.

अहिल्यानगर बाजार समितीत वांग्याची ६२ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. काकडीची ११५ क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ४०० ते १५०० रुपये भाव मिळाला. गवारीची ३१ क्विंटल आवक झाली होती. गवारीला २४०० ते १२ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

फ्लावरची ७९ क्विंटल आवक झाली होती. फ्लावरला १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. घोसाळ्याची १२ क्विंटल आवक झाली होती. घोसाळ्याला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. दोडक्याची २३ क्विंटल आवक झाली होती. दोडक्याला ५०० ते ३००० रुपये भाव मिळाला. कारल्याची ५७ क्विंटलवर आवक झाली होती.

कारल्याला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. भेंडीची ४१ क्विंटलवर आवक झाली होती. भेंडीला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. कोबीची १३९ क्विंटल आवक झाली होती. कोबीला प्रतिक्विंटल ४०० ते ११०० रुपये भाव मिळाला. वालाची ३५ क्विंटल आवक झाली होती.

वालाला १००० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. घेवड्याची १६ क्विंटलवर आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. गाजराची २४ क्विंटलवर आवक झाली होती. गाजराला प्रतिक्विंटल २४०० ते २८०० रुपये भाव मिळाला.

कोथिंबिरीच्या मेथीसह जुडीला १२ रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर बाजार समितीत मेथीच्या ५०६४ जुड्यांची आवक झाली होती. यावेळी मेथी जुडीला ६ ते १२ रुपये भाव मिळाला. कोथिंबिरीच्या १२ हजार ८३१ जुड्या विक्रीसाठी आल्या होत्या. यावेळी कोथिंबिर जुडीला ३ ते १२ रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेपू भाजीच्या २९०३ जुड्यांची आवक झाली होती. शेपू जुडीला ३ ते ४ रुपये भाव मिळाला. पालकच्या ३४४ जुड्यांची आवक झाली होती. पालकच्या जुडीला ५ ते १० रुपये भाव मिळाला.

वाटाण्याला प्रतिक्विंटल ७ हजार रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत वटाण्याची २३ क्विंटल आवक झाली होती. वाटाण्याच्या शेंगांना प्रतिक्विंटल ३ हजार ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. चवळीची ४ क्विंटल आवक झाली होती. चवळीला प्रतिक्विंटल २ हजार ते २ हजार ४०० रुपये भाव मिळाला. दुधी भोपळ्याची ४३ क्विंटल आवक झाली होती. दुधीला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मकाच्या कणसाची १५३ क्विंटल आवक झाली होती. मका कणसाला प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये भाव मिळाला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा