अहिल्यानगरच्या नेप्ती मार्केट यार्डात सोमवारी कांद्याला १६०० रुपये भाव

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 26, 2025

अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती मार्केट यार्डात सोमवारी गावरान लाल कांद्याच्या भावात दोनशे रुपयांनी घट झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल १८०० रुपये भाव मिळाला होता. परंतु सोमवारी झालेल्या लिलावात एक नंबर गावरान कांद्याला प्रतिक्विंटल २२०० ते १६०० रुपये भाव मिळाला. दरम्यान, आठ ते दहा दिवसांपूर्वी कांद्याचे भाव दोन हजार रुपयांपर्यंत गेले होते.

अहिल्यानगर बाजार समितीत सोमवारी ९५ हजार ९४६ कांदा गोण्यांमध्ये ५२ हजार ७७० क्विंटल गावरान लाल कांद्याची आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला ८०० ते १२०० रुपये, तीन नंबर कांद्याला ४०० ते ८०० रुपये, तर चार नंबर कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ४०० रुपये भाव मिळाला.

दरम्यान, कांद्यावरील निर्यातशुल्क मागे घेऊनही कांद्याचे भाव घसरले आहेत. शेतकरी अद्यापही मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी काढताना दिसत नाही. शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेला. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही कांद्याच्या भावात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

अहिल्यानगर बाजार समितीत सोमवारी ४७९ वाहनांमध्ये कांदा विक्रीसाठी आलेला होता. दरम्यान सोमवारी झालेल्या लिलावात ७७ कांद्याच्या गोण्यांना सर्वाधिक प्रतिक्विंटल १८०० रुपये भाव मिळाला. तर ८१ कांदा गोण्यांच्या लॉटला उच्च प्रतिचा १७०० रुपये भाव मिळाला. अहिल्यानगर जिल्हा नाशिकनंतर सर्वात जास्त कांदा उत्पादक जिल्हा आहे. त्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवलेला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा