अहिल्यानगरच्या मार्केट यार्डात पेरूच्या भावात ४०० रूपयांनी घसरण, मात्र सफरचंदाचे भाव स्थिर

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 25, 2025

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रविवारी विविध फळांची ५०४ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये पेरूची सर्वाधिक २९१ क्विंटल आवक झाली होती. यावेळी पेरूला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

कालच्या तुलनेत पेरूच्या भावात ४०० रुपयांनी घसरण झाली. सफरचंदाची २४ क्विंटल आवक झाली होती. सफरचंदाचे भाव स्थिर असून प्रतिक्विंटल ७ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

अहिल्यानगर बाजार समितीत रविवारी डाळिंबांची ३९ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते ११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ६६ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी मोसंबीला १००० ते ४५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा